Thursday, September 28, 2006

पाडस

बरेच दिवस पाडस हे राम पटवर्धन अनुवादित पुस्तक वाचायचे होते. काल त्याचे पहिले प्रकरण वाचले आणि थांबलोच. ज्योडी जसा आनंदाने झिंगून जातो तसेच मला हे प्रकरण 'चढले'. त्यात ज्योडीला लाभतो, तसे आनंदी दिवस अगदी मोजकेच - ते यावे लागतात, आणता येत नाहीत. लौकिकार्थाने इतर चार दिवसांसारखाच एक दिवस. इतरांच्या दृष्टीने काही विशेष न घडलेला. पण मनात दाटलेल्या अतीव समाधानामुळे स्वतःवर आणि एकंदरच जगावर खूष असण्याचा. ईर्ष्यापूर्तीचा, काहीतरी जिंकल्याचा, काहीतरी मिळवल्याचा असे सगळे आनंद जिथे थिटे पडतात अशा निर्भेळ, निर्हेतुक सुखाचा.

मला शाळेत कधीतरी वाचलेल्या 'श्रीनिवास पानसेचे अंगण' या गोष्टीची आठवण झाली.