Saturday, June 20, 2009

Bipin Nadkarni movies

श्वास चित्रपटानंतर मराठी चित्रपटांनी कात टाकली. सुरुवात करुन देण्यास श्वास कारण झाला, एवढेच माझ्या लेखी त्याचे श्रेय. मला तो चांगलाच बटबटीत आणि एक सामान्य प्रतीचा चित्रपट वाटला होता/वाटतो. melodramatic.
या काळात, बिपिन नाडकर्णी या दिग्दर्शकाचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. उत्तरायण आणि एवढसं आभाळ.
दोन्हीही आवडले. उत्तरायण मी बराच आधी पहिला होता. आज एवढसं आभाळ् पाहिला.
सुरेख कथा - आणि दोन्ही चित्रपटांत मांडणी अतिशय संयतपणे केली आहे.

कित्यकदा चित्रपट पाहिल्यावर लोक चित्रपट आवडला, कारण काय सुरेख गाणी होती, काय जबरी acting होती अशा प्रतिक्रिया देतात. ते एका परीने दिग्दर्शकाचे अपयश म्हटले पाहिजे. अभिनय, संगीत, छायाचित्रण ही सगळी साधने आहेत्, त्याला काय म्हणायचे आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याची.
या कसोटीवर नाडकर्णी १०० तक्के यशस्वी होतात.

माझ्या collection मधे highest rating. दोन्ही आवर्जून पहा.

0 Comments:

Post a Comment

<< Home