पाडस
बरेच दिवस पाडस हे राम पटवर्धन अनुवादित पुस्तक वाचायचे होते. काल त्याचे पहिले प्रकरण वाचले आणि थांबलोच. ज्योडी जसा आनंदाने झिंगून जातो तसेच मला हे प्रकरण 'चढले'. त्यात ज्योडीला लाभतो, तसे आनंदी दिवस अगदी मोजकेच - ते यावे लागतात, आणता येत नाहीत. लौकिकार्थाने इतर चार दिवसांसारखाच एक दिवस. इतरांच्या दृष्टीने काही विशेष न घडलेला. पण मनात दाटलेल्या अतीव समाधानामुळे स्वतःवर आणि एकंदरच जगावर खूष असण्याचा. ईर्ष्यापूर्तीचा, काहीतरी जिंकल्याचा, काहीतरी मिळवल्याचा असे सगळे आनंद जिथे थिटे पडतात अशा निर्भेळ, निर्हेतुक सुखाचा.
मला शाळेत कधीतरी वाचलेल्या 'श्रीनिवास पानसेचे अंगण' या गोष्टीची आठवण झाली.
मला शाळेत कधीतरी वाचलेल्या 'श्रीनिवास पानसेचे अंगण' या गोष्टीची आठवण झाली.
9 Comments:
http://www.manogat.com/node/6008
इथे या विषयावरील माझे लिखाण वाचावे. 'पाडस' ही माझीही अत्यन्त लाडकी कादम्बरी आहे.
सन्जोप राव
धन्यवाद संजोप. सुरेख आहे तुमचा ब्लॉग, पण plz त्यावर comments activate करा.
पराग, तुझा ब्लॉग आवडला. भारतात आल्यावर हे पुस्तक नक्की घेईन.
-नमिता
पराग, तुझा ब्लॉग आवडला. भारतात आल्यावर हे पुस्तक नक्की घेईन.
-नमिता
thanks namita.
lekh aavaDalaa. Padas aaNi yearling hee donhi pustake vaachali paahijet yaa yaadeet aahet. 'श्रीनिवास पानसेचे अंगण' baddal adhik lihoo shakaal kaa?
thanks nandan.
ती गोष्ट बहुतेक वसुधा (वीणा?)पाटील यांची होती.
श्रीनिवास पानसे हा लेखिकेचा विद्यार्थी अतिशय सुरेख निबंध लिहित असतो. माझे अंगण, माझा सर्वात आनंदाचा क्षण या विषयांवर इतर मुलांपेक्षा अगदीच वेगळे निबंध लिहित असतो तो.
'चांदणी रात्र असताना अंगणात रातराणी फुललेली असताना बाबा बुलबुलतरंग वाजवत असतात' हा त्याचा आनंद. 'खूप पाऊस पडल्यावर अंगणात पाणी तुंबून राहते. त्या पाण्यात मी होड्या सोडत असतो आणि माझ्याबरोबरीने बाबाही पाण्यात खेळत असतात. आई जेव्हा अगदी वैतागून जाते तेव्हा मग आम्ही हळूच अडथळा काढतो आणि पाणी वाहून जाते' त्यावेळी त्याला टाळ्या पिटून नाचावेसे वाटते.
I was referring to this part of the story.
At the end of the story, the writer meets shrinivas after a long period. She enquires about his parents and tells that she always wanted to visit his home. He says he has no home and has always been staying in an orphanage.
hi parag, thanks for the explanation. hee goShTa kuthalya pustakat vachayala miLel, kahi kalpana? btw, 'br' baddal nakki liha. aapali sthiti baRyachada 'hatti aaNi 7 aandhaLe' ashee asate. tyamuLe tumachya lekhaatoon nakkeech naveen pailu samaju shakateel.
i an reading padas i and i loved it too. i liked story you explain.
"kimaya" by madhav achaval is one of the best book i have read in past but i can't get it anywhere.
Post a Comment
<< Home