Wednesday, February 22, 2006

अनंत भालेराव

अनंत भालेराव यांची पुस्तके वाचली आणि पहिली जाणीव झाली की तुकाराम , ज्ञानेश्वर माहीत असणे ही केवढ्या भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या लेखांची ( मांदियाळी मधल्या - मुळात मांदियाळी हादेखील सुरेख शब्द आहे. पसायदानात येतो. 'ईश्वरभक्तांची मंदियाळी'-) शीर्षके पहा :विधीचे जानीते, पक्षी होते विहंग झाले, बाबासाहेब परांजपे : आम्हावरी सुदर्शन घरटी करी.आणखी दोन पुस्तकांची नावेही अशीच आहेत : पळस गेला कोकणा हे प्रवासवर्णनाचे आणि आलो याचि कारणासी हे अग्रलेखांचे पुस्तक.

वेळेअभावी लिहायचे अर्धवट राहिले आहे. लवकरच हा लेख पूर्ण करेन.

Saturday, February 18, 2006

मराठीत लिहायचा प्रयोग

युनिकोड मधे कसे लिहावे हा बरेच दिवस पडलेला प्रश्न होता. software download करणे शक्य नाही इथे. परन्तु ही link http://www.hindini.com/tool/hug2.html सापडली आणि काम अगदी सोपे होउन गेले! वा बुवा , मजा आली ! आता फक्त ना. सी. फडक्यांचे प्रतिभासाधन पुस्तक मिळवले, की झालोच मी लिहायला सज्ज.
आज दोन छान लिन्क्स सापडल्या :
http://www.newsonair.com/regional.html
मराठी बातम्या ऐकायला सुरेख वाटते. लहानपणी दररोज रेडिओ ऐकायचो. ते आठवते.
http://marathiblogs.net/
सगळ्या मराठी blogs ची सूची आहे.