Tuesday, April 07, 2020

Nostalgia

जबरी nostalgia आला आहे. बऱ्याच काळाने जरा उसंत मिळाली आहे. कोरोना प्रकारामुळे बरेच दिवस घराबाहेर पडणे झालेले नाही. काम चालू आहे. पण ठराविक लोक सोडून कोणाशी बोलणे नाही फारसे.  टीव्ही आम्ही पाहत नाही. फोनचा कंटाळा येतो. त्यामुळे असेल.

मागची 4/5 वर्षे फार धावपळीची गेली. शिवाय आई बाबा,  बायको मुलगी सगळे  बरोबर होतो. आणि रिकामा वेळ स्मार्टफोन आणि सोशल मीडिया खात असे. मागे वळून बघायला वेळ  झाला नाही..

काल परवा जुने ब्लॉग वाचले काही. ती दुनिया अगदी वैराण झाली आहे. लेखन फारसे नाही आणि मलाही वाचन झेपत नाही आहे. Attention span कमी झाला आहे. Bulletin boards फारसे धड नाहीत. चाळीशी नंतर सिंहावलोकन करु सवडीने.

0 Comments:

Post a Comment

<< Home