Monday, May 19, 2008

एक दुर्लक्षित विनोद्कार

विनोदी लेखन ही एक अवघड गोष्ट आहे. हे स्वानुभवाचे नसून समीक्षकी बोल आहेत. आम्ही बालपणापासूनच वि. आ. बुवा, राजा राजवाडे आणि त्यांच्यासारख्या कित्येक लेखकांचे वाचन केल्याने ( पुर्वायुष्यातल्या चुका लपवून काय मिळवणार आम्ही?) विनोदी लिखाणाचा कधी प्रयत्नच केला नाही. विनोद जमला नाही की काय, कोणीही येरू टपल्या मारून जातो. कविता, तात्विक लिखाण यांचे तसे नाही. कशाचा अर्थ काय यात वर्षेच काय्, शतकेही निघून जाऊ शकतात.

असेच एक दुर्लक्षित विनोद्कार हल्लीच आमच्या वाचनात आले. हर्षद सरपोतदार म्हणून. पाप्याचे पितर नावाचे त्यांचे श्रीविद्या प्रकाशनाने १९९६ मधे प्रसिद्ध् केलेले पुस्तक आहे. निव्वळ अफलातून्! त्यानंतरही एक पुस्तक आल्याचे ऐकिवात आहे, पण मिळाले नाही.
आम्ही वाचलेल्या पुस्तकातला एक निवडक उतारा वाचा पुढील पोस्ट मधे.