Sunday, May 28, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

खरे म्हणजे आज मी आवडत्या पुस्तकांविषयी लिहायचे ठरवले होते. मंजिरीने tag केलेला खेळ पुढे सुरु ठेवण्यासाठी.पण दुसरेच काहीतरी लिहीत बसलो. आत आठवतात ती पुस्तके लिहून टाकतो.

१.शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -
छायाप्रकाश - नरहर कुरुंदकर


२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहीती
आणीबाणीच्या काळात लिहीलेल्या लेखांचे संकलन. कुरुंदकरांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे तर्कशुद्ध विचार, ते मांडण्याची प्रभावी शैली आणि ते समजावून देण्याची सुरेख हातोटी.

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके
बनगरवाडी - माडगूळकर
माणसे- अरभाट आणि चिल्लर - जी. ए.
मी एस एम - एस्. एम्. जोशी
शारदा संगीत, वनवास, पंखा - प्रकाश नारायण संत्
अनुवादित - वंशवृक्ष - S.L. Bhairappa, चौघीजणी इ.

(या यादीत काहीतरी गडबड आहे. पु. ल., चिं. वि. अणि मिरासदारांची सगळी पुस्तके टाकली पाहिजेत इथे.)

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-
* - शांता शेळके
*- गोवंद तळवलकर
*- व्यंकटेश माडगूळकर्
बाकी शून्य, लमाण्, ह्र्दयस्थ, आत्मरंग, बापलेकी ई.

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -

... पुढील वेळी लिहीन.

तळवलकरांच्या लेखाचे निमित्त

आज म. टा. मधे गोविंद तळवलकरांचा लेख आला आहे. पहिल्या पानावर. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1581098.cms
बाकी संपूर्ण अंकात वाचण्यासारखे काहीही नाही. तळवलकर लिहीतात, हे सरकार सोनियांनी बरखास्त करुन टाकावे. लेखातील मुद्यांशी असहमत होण्यासारखे काही नाही. परिस्थिती वाईट आहेच. परंतु, सत्ताबदल हेच याचे उत्तर आहे काय? विलासराव देशमुख यांच्यात काही करुन दाखवण्याची इच्छा आणि धमक दिसत नाही. सेना -भाजप कसे बसे टिकून आहेत. समर्थ राजकीय नेतृत्व एकही नाही. तेव्हा सरकार बरखास्तीने काय साध्य होणार नाही. तळवलकरांचा उद्वेग समजण्यासारखा आहे. पण त्यावर उपाय काय हे मात्र कळत नाही.
जानेवारीपासून ३६० शेतकरी आत्महत्या करतात आणि विधान परीषदेत प्रमोद नवलकर चर्चा करतात fashion show मधील wardrobe malfunction वर आणि मागणी करतात त्याची पोलिस चौकशी करण्याची. या मृत्यूंपेक्षा, त्यावर सरकारला काही कृती करण्यास भाग पाडण्यापेक्षा, नवलकरांनी मांडलेले विषय अधिक महत्वाचे आहेत का? विरोधकांचे काम सरकारला पाडायचा प्रयत्न करणे, संधी मिळाली की कशावरुनही सरकारला कोंडीत पकडणे हे नसून, सरकारकडून योग्य प्रकारे समस्या सोडविल्या जात आहेत की नाहीत हे पाहणे असावे असे यांना वाटत नसावे.
यास माध्यमेही जबाबदार आहेत. "अभिषेक-ऐश्वर्या कुंडलियाँ मिली" ही यांची breaking news. जर शेतकर्यांच्या समस्या, आत्महत्या या बातम्या मुख्य नसतील,त्यांना बातमीपत्रांत जागाच नसेल, तर लोकांना त्या कळणार कशा? सरकारला त्यासाठी जाब कोण विचारणार? da vinci code ला विरोध आणि फना गुजरातेत प्रदर्शित होत नाहीत या मुख्य बातम्या आणि मृत्यूंचे उल्लेखही नाहीत. प्रसिद्धीलोलूप लोकप्रतिनिधी तरी कशाला या मुद्दांवर बोलतील? तसे मृत्यूंचेही उल्लेख होतात. कोणी एक नफिसा जोसेफ नावाची मॉडेल आत्महत्या करते, त्याची चर्चा चालते आठवडाभर. त्या बातमीच्या निमित्ताने अजून काही celebrities च्या प्रतिक्रिया दाखवता येतात, तिच्या खाजगी आयुष्याचे वाभाडे काढता येतात आणि वाहिनीचा TRP वाढवता येतो. Times group च्या जैन मंडळींना तर क्षमाच नाही. TOI चे म. टा. चे tabloid बनवून ठेवले आहे.( म. टा. तील मराठी तर वाचवत नाही. पुढील वाक्य पहा:- 'विजया चौक नावाचे झंझावात शांत झाले'. यंव रे पठ्ठे! तो झन्झावात नाही, ते झन्झावात ? आणि हे अपवादात्मक उदाहरण नाही.दररोज अशी भरपूर वाक्ये असतात. बिघडलेली भाषा हा एका सर्वस्वी वेगळ्या लेखाचा विषय होईल.)
मुंबई सारख्या ठिकाणी रस्ते, सांडपाणी निचरा,पाणीपुरवठा या basic infrastructure (याला मराठी शब्द काय?) ची दयनीय स्थिती असताना , शिक्षण क्षेत्रात बजबजपुरी माजलेली असताना (आरक्षणाविषयी बोलत नाही आहे. अभियांत्रिकीचे प्राध्यापक पहा. विशेषकरुन संगणक विभागचे. आहा, धन्य ते शिक्षक जे screensaver ची print-out काढून आणायला सांगतात.) कोणत्या प्रगतीच्या गप्पा आपण मारतो कळत नाही.

Sunday, May 07, 2006

माकडाच्या हाती शॅम्पेन

आज नाटक पाहिले: माकडाच्या हाती शॅम्पेन. बर् याच दिवसांनी चांगले नाटक बघायला मिळाले. विवेक बेळे यांचे लेखन आहे. विषय वेगळा आहे आणि मांडणी सुरेख. माकडाची भूमिका करणारा आनन्द इंगळे अफलातून. त्याला दिलेली 'उदाहरण देउन समजावून सांगायची' लकब खासच. पुस्तकची भूमिका करणारा संदेश कुलकर्णी अगदी typical पुणेरी वाटतो. ह्याचे संवाद तर अफाट आहेत. "तू माझ्यासाठी मारामारी करशील का?" याच्या उत्तरादाखल हा सांगतो, पुस्तकांचा उपयोग कुणी मारण्यासाठी नाही करत.कधीकधी एखादा डास फारतर मारायला ठीक आहे. त्याने थेट कुणाला मारता येत नाही. माकड त्याला हे म्हणणे अधिक स्पष्ट करायला सांगतो. याचे उत्तर : गांधीजींच्या हातातली काठी इन्ग्रजांना मारण्यासाठी होती का? संदेश जाधव -चाकू-ठीक. कशालातरी हा उपमा देतो हे म्हणजे शंकराशी आंधळी कोशिंबिर खेळण्यासारखे आहे! शर्वाणी पिल्लेने काम छान केले आहे, विशेषतः दुसर्या अंकात अधिक प्रभावी वाटते. दिसलीआहे सुद्धा सुन्दर.

खरे म्हंजे आता या नाटकची कथा लिहायला पाहिजे. पण सगळे सांगत बसण्यात मजा नाही. प्रेक्षकांमधे मकरंद देशपांडे होता. पाटिल त्याच्याबरोबर चहा घेउन आले पहिल्या अंकानंतर.

http://makadachyahati.blogspot.com/